मुंबई

लागू बंधूंच्या दागिन्यांचे चेंबूर येथे भव्य प्रदर्शन आणि विक्री

Swapnil S

मुंबई : लागू बंधू हे देशातील प्रतिथयश ज्वेलर्सपैकी एक नाव. गेली ८६ वर्षे अत्यंत सचोटीने आणि कुशलतेने नाविन्यपूर्ण असे दागिने त्यांच्या ग्राहकांसाठी घडवत आहेत. लागू बंधू हे नाव उच्चारताच डोळ्यापुढे येतात ते आकर्षक कलाकुसर व डिझाईनचे, हिरे-मोती व नवरत्नांचे तसेच सोन्याचे हॉलमार्क केलेले दागिने. त्यांच्या सुंदर दागिन्यांनी संपूर्ण देशालाच भुरळ घातली आहे.

आताही ‘रत्नांचे माहेर’ हे अत्यंत नावाजलेले आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले प्रदर्शन आणि विक्री यंदा चेंबूरकरांसाठी एकर्स क्लब येथे भरवण्यात आले आहे. १७ व १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायं. ८:३० वा. पर्यंत हे प्रदर्शन आणि विक्री रत्नांच्या चाहत्यांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्राहक त्यांचे मनपसंत दागिने खरेदी करू शकतात तसेच आकर्षक ऑफर्सचा लाभही घेऊ शकतात. दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्के सूट तसेच प्रत्येक ५०,००० रु. च्या खरेदीवर मोफत सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. लागू बंधूचे हे ‘रत्नांचे माहेर’ ग्राहकांसाठी पर्वणीच असणार आहे यात काही शंका नाही.

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?