मुंबई

मुंबई लोकलमध्ये तरुणीसोबत होमगार्डचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल होताच झाली कारवाई

तरुणी तिच्या आईसोबत चिंचपोकळीहून सँडहर्स्ट रोड स्थानकाकडे जात होती.

नवशक्ती Web Desk

आजच्या पिढीला रील बनवण्याचे इतके वेड लागले आहे की ते कोणत्याही औषधाने बरे होऊ शकत नाही. हे लोक फक्त संधी शोधत असतात आणि संधी मिळताच रील बनवायला सुरुवात करतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका मुलीने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्वतःचा डान्स करतानाचा व्हिडिओ बनवला होता. ती नाचत असताना तिथे एक होमगार्ड उभा होता. थोडावेळ हा डान्स पाहिल्यानंतर होमगार्डमधील डान्सरही जागा होतो आणि तिच्यासोबत ठेका धरतो. पण, आता हा डान्स त्याला चांगलाच महागात पडला आहे.

मध्य रेल्वेच्या लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात 6 डिसेंबर रोजी रात्री 10.10 ते 10.15 दरम्यान ही घटना घडली. महिलांच्या सुरक्षेसाठी लेडिज डब्यात होमगार्ड एस.एफ.गुप्ता तैनात होते. त्यावेळी एक तरुणी तिच्या आईसोबत चिंचपोकळीहून सँडहर्स्ट रोड स्थानकाकडे जात होती. तरुणीने डान्स करण्यास सुरूवात केली, तिची आई व्हिडिओ बनवत होती. त्यावेळी गुप्ता यांनीही तिच्यासोबत डान्स केला.

जीआरपीने केली कारवाई

हा व्हिडिओ व्हायरल होताच जीआरपीने याप्रकरणी गुप्ता यांच्याकडून 8 डिसेंबर रोजी स्पष्टीकरण मागितले आणि त्यांच्याविरोधात डिफॉल्ट रिपोर्ट दाखल केला आहे. तसेच, सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता दक्षता घेत आहोत, असेही सांगितले.

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार