मुंबई

हनुमान चालीसा पठण प्रकरण: राणा दाम्पत्य गैरहजर राहिल्याने न्यायालय कडाडले

न्यायाधीश राहुल रोकडे यांनी न्यायालयाला हलक्यात घेऊ नका, अशी तंबी देताना राणा दाम्पत्याला ११ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले.

Swapnil S

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राणा दाम्पत्याच्या गैरहजेरीमुळे मुंबई सत्र न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी न्यायालयाला हलक्यात घेऊ नका, अशी तंबी देताना राणा दाम्पत्याला ११ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले. गैरहजर राहिल्यास ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जारी केले जाईल, असेही न्यायालयाने बजावले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांचा दोषमुक्ततेचा अर्ज न्यायालयाने फेटाळताना आरोप निश्चितीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राणा दाम्पत्याच्या वतीने न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी तसेच दोषमुक्तेचा अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला हायकोर्टात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. यावेळी न्यायालयाने संताप व्यक्त केला.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे