मुंबई

हार्बर मार्गाचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार

डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन या स्थानकांपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकही लवकरच उन्नत होईल.

प्रतिनिधी

हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत लवकरच विस्तार करण्यात येणार असून या प्रकल्पामध्ये हार्बरवरील मालाड स्थानक उन्नत करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन या स्थानकांपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकही लवकरच उन्नत होईल.

हार्बर मार्गावर सीएसएमटी - पनवेल, सीएसएमटी – अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ उजाडले. परंतु तांत्रिक कारणास्तव प्रत्यक्षात गोरेगावपर्यंत लोकल गाड्या मार्च २०१९ पासून धावू लागल्या. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प एमयूटीपी-३ ए अंतर्गत राबविण्यात येत आहे. दरम्यान, या मार्गिकेच्या संरेखन योजनेवर पश्चिम रेल्वेकडून काम सुरू आहे. गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्गासाठी उपलब्ध जागेचा विचार करता तो काही पट्ट्यात उन्नत (एलिव्हेटेड) करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी