मुंबई

हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना दिलासा कायम

नवशक्ती Web Desk

मुंबई : कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे सोमवारी गैरहजर असल्याने सुनावणी ६ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे, तोपर्यंत अटक व अन्य कारवाई करू नये, असे ईडीला दिलेले निर्देश कायम ठेवण्यात आले आहेत.

ईडीने कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध आर्थिक अफरातफरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली. या अनुषंगाने ईडीकडून निष्कारण अटक केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत हसन मुश्रीफ यांचे मुलगे नाविद, आबिद आणि साजिद यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जांवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी ४ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र न्यायाधीश गैरहजर राहील्याने सुनावणी बुधवारीपर्यंत तहकूब ठेवण्यात आली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस