मुंबई

स्लम एरियात राहणाऱ्या रहिवाशांसाठी घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार

प्रतिनिधी

प्रत्येक मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत नवनवीन योजना राबवण्यात येतात. विशेष म्हणजे, स्लम एरियात राहणाऱ्या रहिवाशांना आरोग्य सुविधा घराजवळ उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत झोपडपट्टी परिसरात ऑक्टोबरपासून आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. स्लम एरियातील दवाखान्यात तब्बल २०० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधेत नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत. झोपडपट्टीतील रहिवाशांना घराजवळ दवाखाना उपलब्ध झाल्यास त्यांचा पैसा व वेळेची बचत होणार आहे. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात पालिकेने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० त्यापैकी ५० केंद्र ऑक्टोबर, तर दुसर्‍या टप्प्यात आणखी १०० आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेची नियमित आरोग्य केंद्रे दुपारी ४ वाजता बंद झाल्यानंतरही नवी आरोग्य केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्ससह परिचारिका, सफाई कामगाराची नेमणूकही केली जाणार आहे. या उपक्रमासाठी भरती केलेल्या २०० डॉक्टरांपैकी ९० डॉक्टर्सची शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे.

जागेसाठी खासगी जमीनमालकांना आवाहन

आरोग्य केंद्रांच्या उपक्रमासाठी झोपडपट्टीभागात पालिकेला आवश्यक त्या प्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी जमीनमालक, तयार बांधकामाच्या मालकांना आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करणार आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात येणार्‍या ६०० ते ८०० स्वेअर फूट जागांच्या भाड्याचा योग्य मोबदला संबंधित जागामालकांना दिला जाणार आहे.

या जागांची निवड करण्यासाठी वॉर्ड ऑफिसरचा समावेश असलेली त्रीसदस्यीय समिती करणार आहे.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही