मुंबई

नवी मुंबई, ठाणे, कल्याण शहरात जोरदार पाऊस 

ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पावसामुळे ५ ते ६ मिनिटे उशिराने धावत होती

देवांग भागवत

राज्यभरात वातावरणात दिवसाआड बदल होताना दिसत आहे. कधी उष्ण, कधी दमट तर कधी अचानक पावसामुळे ऋतुचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशातच मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई, ठाणे, कल्याण शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. तर मुंबईसह उपनगरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, दुपारनंतर कामावरून घरी जाण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने मुंबईत चाकरमान्यांची तारांबळ उडाली. तर ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पावसामुळे ५ ते ६ मिनिटे उशिराने धावत होती. 

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर