मुंबई

आता सीएसएमटी इमारतीचा हेरिटेज वॉक!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानक. ब्रिटीशकालीन सीएसएमटी स्थानकातील इमारतीचा हेरिटेज वॉक आता अधिक सोपा झाला आहे. घरबसल्या हेरिटेज वॉकसाठी ‘बुक माय शो’वर तिकीट बुक करणे सोयीस्कर झाले आहे. विशेष म्हणजे हेरिटेज वॉकसाठी एका विद्यार्थ्याला १५० रुपये तर इतरांसाठी ५०० रुपये तिकीट असणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक मुख्य स्थानक आहे. या स्थानकातून देशभरात मेल-एक्स्प्रेस व मुंबईची लाईफलाईन धावते. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात रोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरऊ असते. यात विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकाला भेट देत असतात. सीएसएमटी स्थानकातील ऐतिहासिक वास्तूंचा उलगडा पर्यटकांसमोर व्हावा, यासाठी हेरिटेज वॉक संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.‌

परवानाधारकांना पर्यटकांचे स्वागत आणि आवश्यक पास देणे, ओळखपत्र आणि मार्गदर्शन यांसारख्या उद्देशांसाठी रिसेप्शन किऑस्क उभारण्याची परवानगी दिली जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या ठिकाणी हेरिटेज वॉक

मेनलाइन कॉन्कोर्स, वर्ल्ड हेरिटेज बिल्डिंग - स्टार चेंबर, स्टार चेंबरजवळील हेरिटेज गॅलरी, रेल संग्रहालय आणि सेंट्रल डोममधील स्मारक

व्हिडिओ शूटिंगला बंदी

हेरिटेज साईटमधील सर्व परवानगी असलेल्या ठिकाणी भेट देण्याच्या ठिकाणांचे छायाचित्रण करण्याची परवानगी असेल. मात्र, व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. तसेच कॅमेरा, फोटोग्राफीला परवानगी देण्यासाठी अतिरिक्त शुल्क वसूल केले जाणार नाही.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत