मुंबई

पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवर कारवाई होणार; मुंबई पोलिसांचा इशारा

होळी सणाच्या निमित्ताने महिलांना लक्ष्य करून मारले जाणारे फुगे आणि अश्लील वर्तन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने महिलांना लक्ष्य करून मारले जाणारे फुगे आणि अश्लील वर्तन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग फेकणे, साध्या, रंगीत पाण्याने अथवा कुठल्याची द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे त्याचप्रमाणे अश्लील शब्द, घोषणा, गाणी उच्चारणे, कोणाचीही प्रतिष्ठा दुखावेल अशा प्रकारचे हावभाव करणे, जातीय तणाव रोखण्यासाठी १२ ते १८ मार्च या कालावधीसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे पत्रक उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केले आहे.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...