मुंबई : किशोरवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुटका केली. ‘आय लव्ह यू’ म्हणणे केवळ भावना मांडणे आहे. त्यात कोणताही लैंगिक हेतू नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.
२०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा हात धरून आरोपीने ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. त्याच्याविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. नागौर येथील विशेष कोर्टाने २०१७ मध्ये त्याला दोषी ठरवले. या निकालाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्या. उर्मिला जोशी-फाळके यांनी निकालात सांगितले की, पीडितेशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याचा खरा हेतू होता हे दर्शविणारी कोणतीही परिस्थिती या प्रकरणात दिसत नाही. ‘आय लव्ह यू’ हे शब्द स्वतःच विचारात घेतल्याप्रमाणे लैंगिक हेतू ठरणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.