आशीष शेलार  संग्रहित छायाचित्र
मुंबई

चित्रपट निर्मात्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ अंमलात आणा; सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांचे निर्देश

सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित चित्रपट निर्माते आणि कलाक्षेत्रासाठी सोयीस्कर एक खिडकी योजना अंमलात आणा, असे निर्देश सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी सांस्कृतिक विभागाला दिले.

Swapnil S

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित चित्रपट निर्माते आणि कलाक्षेत्रासाठी सोयीस्कर एक खिडकी योजना अंमलात आणा, असे निर्देश सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी सांस्कृतिक विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी आशीष शेलार बोलत होते.

सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी सह्याद्री सांस्कृतिक कार्य विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे समाज प्रबोधनाच्या कार्यासोबत राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे, तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित नाट्य आणि चित्रपट निर्मात्यांना सोयीस्कर ठरणाऱ्या आणि मराठी कला क्षेत्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, अशा सूचना मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खरगेही उपस्थित होते.

योजना, प्रकल्प या विषयांवर चर्चा

बैठकीत आगामी १०० दिवसांत करावयाचे उपक्रम, योजना, प्रकल्प, कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांवर मंत्री शेलार यांनी सखोल चर्चा केली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video