मुंबई

वृद्धाची ७२ लाखांची फसवणूक; माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा

याप्रकरणी दोन खासगी कंपनीच्या चार संचालकाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : फ्लॅटचे आमिष दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे ७२ लाख ५० हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन खासगी कंपनीच्या चार संचालकाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. इरफान हाफिजी, सिद्धीक मोहम्मद हाफिजी, इक्बाल हाफिजी आणि फारुख अब्दुल्ला वहाब सारंग (मयत) अशी या चौघांची नावे असून, यातील इक्बाल हाफिजी हा माजी नगरसेवक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२०१० साली जोगेश्‍वरीतील खतिजा इमारतीच्या पुर्नविकासाचे काम हाती घेतले होते. या इमारतीमध्ये आरोपींनी वृद्ध तक्रारदार यांना एक हजार चौ. फुटाचा फ्लॅट तसेच पार्किंग देण्याचे आश्‍वासन दिले होते. फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केल्यांनतर त्यांना २२ व्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे मान्य करून त्याची किंमत ७२ लाख ५० हजार रुपये इतकी सांगण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी २० मे ते ४ ऑगस्ट २०१० या कालावधीत त्यांना टप्याटप्याने ७२ लाख ५० हजार रुपये दिले होते. संपूर्ण पेमेंट केल्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा एक करार झाला होता. काही महिन्यानंतर ते इमारतीचे बांधकाम पाहण्यासाठी गेले असता त्यांना इमारतीचे बांधकाम बंद असल्याचे दिसून आले. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल

१ ऑगस्टपासून ‘ईएलआय’ लागू होणार; दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणार; योजनेला केंद्र सरकारची मंजुरी