मुंबई

तरुणांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ

बैठी जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे सध्या तरुणांमध्येही सांधेदुखीच्या तक्रारी आढळून येत आहेत.

स्वप्नील मिश्रा

बैठी जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे सध्या तरुणांमध्येही सांधेदुखीच्या तक्रारी आढळून येत आहेत. विशेष म्हणजे ३५ आणि ५० या वयोगटातील तरुणांमध्ये सांधेदुखीचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे, पोषक आहार आणि व्यायामाचा अभाव तसेच वाढलेले धूम्रपान आणि मद्याच्या सेवनामुळे तरुणांच्या शरीरावर परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या काळात तरुण वर्गात सांधेदुखी आणि हाडेदुखीची समस्या कायम बनली आहे. विशेष म्हणजे, संधिवाताच्या अनेक तक्रारी डॉक्टरांकडे येत आहेत. बोटे, मनगटे सुजणे तसेच वेदना होणे आणि मानेमध्ये ताठरता येणे यांसारख्या तक्रारी घेऊन तरुण पिढी डॉक्टरांकडे येत आहे.

“वयस्कर मंडळी सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे यायचे, पण आता घरून काम करणारी विशी आणि चाळीशीतील तरुण मंडळी सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन येत आहेत. वर्क फ्रॉम होम, चरबीयुक्त खाणे, चहा-कॉफीचे वाढते प्रमाण तसेच कोरोनातून सारवलेली ही मंडळी सांधेदुखीने त्रस्त आहेत. वयाच्या चाळीशीतच १५ ते २० टक्के तरुण मंडळींना संधिवाताने ग्रासले आहे,” असे पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ ऑर्थोपेडिक डॉक्टरने सांगितले. सर जमशेदजी जीजीभॉय हॉस्पिटलमधील एका ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितले की, “गेल्या २-३ महिन्यांत सांधेदुखीच्या तक्रारी घेऊन ३० तरुण आले होते. त्यापैकी ६० टक्के महिला तर ४० टक्के पुरुषांचा समावेश होता. काही वेळेला औषधांच्या दुष्परिणामामुळेही सांधेदुखीच्या तक्रारी जाणवतात.”

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती