व्हॉट्सअ‍ॅपवर देखील ब्लू टिक मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या अकाऊंटशी बोलत आहात ते खरं आहे की नाही ते ओळखणं सोपं होईल. परंतु ही ब्ल्यू टिक सर्वांना मिळणार नाही. 
मुंबई

'उमेद' प्रेरिकांच्या मानधनात वाढ; मोबाईल, प्रवास खर्च देखील मिळणार

राज्यात बचत गटांची चळवळ सर्वदूर पसरली असून लाखो महिला त्यात सहभागी आहेत.

Swapnil S

मुंबई : बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रेरिकांना (सीआरपी) जाहीर केलेली मानधन वाढ त्वरित लागू करण्याबरोबरच त्यांना प्रवास भत्ता आणि मोबाईल फोनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

राज्यात बचत गटांची चळवळ सर्वदूर पसरली असून लाखो महिला त्यात सहभागी आहेत. या महिलांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उमेद अभियानांतर्गत प्रेरिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रेरिकांची संख्या ५० हजाराहून अधिक आहे. या महिलांना २०१६ मध्ये नियुक्त केल्यापासून अवघे तीन हजार रुपये मानधन देण्यात येत होते. दरम्यान महाराष्ट्र श्रमिक सभा या संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या प्रेरिकांच्या वतीने ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांची १९ जुलै २०२३ रोजी भेट घेण्यात आली होती. त्यावेळी मानधन तीन हजारावरून सहा हजार रुपये करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार आवश्यक आदेशही निघाला असला तरी प्रत्यक्ष वाढ लागू झाली नव्हती.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र श्रमिक सभेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, सरचिटणीस केतन कदम, सल्लागार संजय परब तसेच प्रेरिका सभेच्या अध्यक्ष मनीषा नारकर व त्यांच्या सहकारी प्रमिला देवरुखकर, दीपिका मुणगेकर, अस्मिता घाडी यांनी मानधन वाढीबरोबरच अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली होती. ग्रामीण विकास विभागाचे वित्तीय नियंत्रक अभय धांडे हेही यावेळी उपस्थित होते.

निधीची तरतूद झालेली असल्यामुळे मानधन वाढ त्वरित लागू करण्यात येईल, तसेच ते नियमित दरमहा दिले जाईल. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रेरिकांनाही मोबाईल देण्याबाबत तसेच प्रवासाच्या खर्चाची प्रतिपुर्ती करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मानधन थेट खात्यावर जमा करण्याबरोबरच कामाशी संबंधित अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उमेद अभियानच्या अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र प्रेरिका सभेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

- सुभाष इंगळे, उपसचिव केंद्रीय योजना विभाग

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video