मुंबई

इन्फ्लूएंझाचा धोका वाढला! वर्षभरात राज्यात ५७ रुग्णांनी गमावला जीव

इन्फ्लूएंझा या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढत असल्याचे दिसते. यंदाच्या वर्षात राज्यात ५७ रुग्णांचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

Swapnil S

मुंबई : इन्फ्लूएंझा या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढत असल्याचे दिसते. यंदाच्या वर्षात राज्यात ५७ रुग्णांचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

वातावरणात बदल होत असताना संसर्गजन्य आजार डोके वर काढत असतात. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गतवर्षी हा आकडा ३६ इतका होता. यंदा या कालावधीत २१ लाख ३३ हजार ६९५ संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी दोन हजार ३२४ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षा याच कालावधीत तीन हजार इन्फ्लूएंझाचे बाधित रुग्ण सापडले होते. इन्फ्लूएंझाने बाधित २५ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

दरम्यान इन्फ्लूएंझापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे. तसेच संशयित लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऋतू बदल झाल्यानंतर संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांत वाढ होते. यंदा इन्फ्लूएंझाच्या रुग्णांत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली नसली तरी मृतांच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे आजाराचा धोका वाढला आहे. वेळीच उपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतल्यास हा रुग्ण बरे होण्याची संख्या मोठी आहे.

लहान मुले, महिला आणि वृद्ध यांना इन्फ्लूएंझाचा अधिक धोका असतो. त्याचबरोबर हृदय किंवा फुफ्फुसचा आजार, मधुमेह अशा सहव्याधीने ग्रासलेले आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना इन्फ्लूएंझाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव