Bollywood Actor Salman khan ANI
मुंबई

पत्रास कारण की... सलमानच्या सुरक्षेत वाढ, अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर

की लवकरच गायक सिद्धू मूसवाला सारखाच प्रसंग त्यांच्यावर येणार

विक्रांत नलावडे

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घराबाहेर सापडलेल्या धमकीच्या पत्रावरून तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याची चौकशी करण्यात आली आहे. सलमान खानचे वडील सलीम ( Salim Khan) यांना रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने, हाताने लिहिलेले धमकीचे पत्र (Threat letter) वांद्रे बॅंडस्टँड प्रोमनेडवर जॉगिंग केल्यानंतर आराम करत असलेल्या बेंचवर दिले आणि ते पत्र सलीम यांना आणि त्यांचा मुलगा सलमान याला उद्देशून होते. हे पत्र उघडून पाहिल्यानंतर त्यावर हिंदीत एकच ओळ लिहिलेली होती, की लवकरच गायक सिद्धू मूसवाला (singer Siddhu Moosewala) सारखाच प्रसंग त्यांच्यावर येणार आहे.

या पत्रावर काही आद्याक्षरांसह स्वाक्षरी आहे ज्याचा पोलिस तपास करत आहेत आणि सलमान खानला लक्ष्य करणाऱ्या भूतकाळातील घटनांशी त्यांचा संबंध आहे का ते उलगडण्याचा प्रयत्नही केला जात आहे. पोलिस सुगावासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत आणि पुढील लीड्ससाठी स्थानिकांची चौकशी करत आहेत.

वृत्तानुसार, बिश्नोई यांच्यावर दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमध्ये पाच डझनहून अधिक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वीदेखील एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मारण्याची धमकी दिली होती. रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये, बिश्नोईच्या एका गुंडाला काळवीट शिकार प्रकरणाच्या संदर्भात बॉलीवूड अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पकडण्यात आले होते. धमकीचे पत्र समोर आल्यानंतर लगेच सोमवारी महाराष्ट्राच्या गृहविभागाने अभिनेता सलमान खानची सुरक्षा अधिक मजबूत केली. त्याला आणि त्याचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला