मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार 
मुंबई

मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार

कोकण रेल्वे नाव असले तरीही प्रत्यक्ष कोकणवासीयांच्या वाट्याला फारच कमी गाड्या आलेल्या आहेत. या मार्गावरून बहुतांशी अन्य राज्यात जाणाऱ्या गाड्या धावत असल्याने कोकणवासीयांसाठी गाड्यांची कायमच वानवा असते. त्यामुळेच मुंबई ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : कोकण रेल्वे नाव असले तरीही प्रत्यक्ष कोकणवासीयांच्या वाट्याला फारच कमी गाड्या आलेल्या आहेत. या मार्गावरून बहुतांशी अन्य राज्यात जाणाऱ्या गाड्या धावत असल्याने कोकणवासीयांसाठी गाड्यांची कायमच वानवा असते. त्यामुळेच मुंबई ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे कोकणवासीयांना हक्काची गाडी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान एका नवीन दैनिक एक्स्प्रेस ट्रेनला मंजुरी दिली आहे. या गाडीचा क्रमांक १५०८७/१५०८८ आहे. या नवीन गाडीमुळे मुंबई आणि दक्षिण कोकणातील रेल्वे दळणवळण अधिक व्यापक होणार आहे. ज्यामुळे हजारो प्रवाशांना थेट प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.

ही एक्स्प्रेस मार्गात २२ स्थानकांवर थांबेल. पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांचा समावेश आहे. या नवीन सेवेचा फायदा कोकण किनारपट्टीला भेट देणारे पर्यटक, शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी, व्यापारी तसेच रोजगार व कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना होईल.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही नवीन ट्रेन भारतीय रेल्वेचे प्रवासी सुविधा सुधारण्यावर आणि कोकणातील रेल्वेची वाढती मागणी पूर्ण करण्यावर असणारे लक्ष दर्शवते. या एक्स्प्रेसमुळे मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर करून ही सेवा स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाला गती देईल अशी अपेक्षा आहे.

तारीख, वेळापत्रक लवकरच जाहीर करणार

मुंबई आणि दक्षिण कोकण दरम्यान रेल्वे सेवा अधिक सुलभ करण्याची दीर्घकाळापासून मागणी करणाऱ्या - प्रवाशांना या नवीन दैनिक एक्स्प्रेसच्या मंजुरीमुळे मोठा - दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या ट्रेनच्या सुरुवातीची तारीख आणि वेळापत्रकासह इतर तांत्रिक तपशील रेल्वे - प्रशासनाकडून स्वतंत्रपणे जाहीर केले जातील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग