मुंबई

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तेजी होती. इन्फोसिस आणि बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्यांहून अधिक वधारला. दरम्यान, भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी मजबूत होऊन ७७.५९ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ६३२.१३ अंक किंवा १.१७ टक्के वधारुन ५४,८८४.६६ वर बंद झाला. दिवसभरात तो ६८४.१ अंक किंवा १.२६ टक्के वधारला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १८२.३० अंक किंवा १.१३ टक्के वाढून १६,३५२.४५ वर बंद झाला.

सेन्सेक्स वर्गवारीत टेक महिंद्रा, इंडस‌्इंड बँक, विप्रो, बजाज फायनान्स, लार्सन ॲण्ड टुब्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांच्या समभागात वाढ झाली. तर एनटीपीसी, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंटस‌् आणि नेस्ले यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि टोकियोमध्ये वाढ झाली. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक वातावरण होते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.९५ टक्का वाढून प्रति बॅरलचा भाव ११८.५ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी गुरुवारी १५९७.८४ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित; राष्ट्रपतींनी पाच सदस्यांना केले नियुक्त

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले! छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख भोवला

हंटर कमिशनने मांडलेले वास्तव व भूमिका

जनसुरक्षा नव्हे जनदडपशाही