मुंबई विद्यापीठ संग्रहित छायाचित्र
मुंबई

मूलभूत संशोधन क्षेत्रात भारताचे अग्रस्थान; मुंबई विद्यापीठात आज विशेष व्याख्यान

भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. (डॉ.) अभय करंदीकर याचे ‘ट्रान्सफॉर्मिंग सायन्स अँड टेक्नोलॉजी लँडस्केप ऑफ भारत’ या विषयावर विशेष व्याख्यान मुंबई विद्यापिठातर्फे आयोजित करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. (डॉ.) अभय करंदीकर याचे ‘ट्रान्सफॉर्मिंग सायन्स अँड टेक्नोलॉजी लँडस्केप ऑफ भारत’ या विषयावर विशेष व्याख्यान मुंबई विद्यापिठातर्फे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार ६ जानेवारी २०२५ रोजी विद्यानगरी संकुलातील ग्रीन टेक्नोलॉजी सभागृहात दुपारी २:३० वाजता हे व्याख्यान पार पडणार आहे.

मूलभूत संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान अग्रक्रमावर आहे. भारताच्या आर्थिक वाढ आणि विकासामध्ये विशेषत: उदयोन्मुख परिस्थिती आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमध्ये विज्ञान क्षेत्रातील संशोधन हे एक शक्तिशाली साधन म्हणून ओळखले जाते. या सर्वांमध्ये भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग महत्त्वाची भूमिका बजावत असते. या पार्श्वभूमीवर प्रा. करंदीकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानासाठी प्रकुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधशास्त्र आणि एमसीए महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संशोधक यांनी पूर्वनोंदणी करून उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास