मुंबई

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत

प्रतिनिधी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात केल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच पुन्हा एकदा चौथ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. रोज आढळणारी रुग्णसंख्या ३०च्या आत आली असताना पुन्हा एकदा ३००च्या घरात नवीन रुग्णांची नोंद होत आहे. तर १० मे रोजी सक्रिय रुग्णांची नोंद ८४४ झाली होती. मात्र त्यातही दुपटीने वाढ झाली असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या १,५३१ वर पोहोचली आहे. तर सहा हजारांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत ३,९७३ वर आला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बळावत असल्याचे दिसून येते.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळाला होता. मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले आहे. तिसरी लाट रोखण्यात यश आल्यानंतर मुंबईसह राज्यातील निर्बंध उठवण्यात आले. त्यानंतर मुंबईत विना मास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. त्यात परदेशातील काही देशांत पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव झाला आहे. मुंबईत ही जुलै महिन्यात चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ हे चौथ्या लाटेचे संकेत असल्याचे मत आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मदतीचेही सुयोग्य वाटप व्हायला हवे!

अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल आणि स्वदेशीचा जागर

आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा