मुंबई

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; २२ ऑगस्टपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये होणारे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राचे प्रवेश हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होणार आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क; एम. कॉम.(अकाउंट्स), एम. कॉम. (व्यवस्थापन), एम.एस. सी. (गणित), एम. एस. सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावरून भरता येणार आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video