मुंबई

माहुलवासीयांचे जगणे झाले अवघड

प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्या नंतर सरकारने माहुलवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप

प्रतिनिधी

माहुल परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे माहुलवासीयांना जगणे अवघड झाले आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजाराने अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे याविरोधात आवाज उठवला उठवल्यानंतर सरकारने या घरांचे वाटप माहुल येथील १६०० कुटुंबांना केले आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्या नंतर सरकारने माहुलवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

माहुल परिसरातील प्रदूषणामुळे माहुल वासियांना कर्करोगासह इतर गंभीर आजाराने जखडले आहे.त्यामुळे यातील काही जण जिवंतपणी नरकयातना भोगत आहेत. अनेक वर्ष आवाज उठवला उठवल्यानंतर सरकारकडून माहुलवासीयांना मुंबईतील रिकाम्या घरांमध्ये स्थलांतर सुरू केले. साधारणता ९ हजार कुटुंबांपैकी ५ हजार कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र याची सत्यता तपासली असता परिस्थिती भयावह दिसली.

माहुलवासीयांना एमएमआरडीएची जी घरे देण्यात आली आली आहेत त्या इमारतींच्या आसपास कचऱ्याचे साम्राज्य आहे.काळवंडलेल्या या इमारती भग्न अवस्थेत आहेत. त्यातील घरांना ना दारवाजे आहेत ना खिडक्या.वीज,पाणी तर दूरची गोष्ट. हजारो रिक्त घरे गर्दुल्यांचे अड्डे झाले आहेत.त्यामुळे अनेक घरांमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. ही घरे पाहताच माहुलवासीयांचा भ्रमनिरास झाला.अशा घरांमध्ये राहायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा