मुंबई

सीएसएमटी-पनवेल हार्बर, कल्याण, कसारा, खोपोली मार्गावर नवीन फेऱ्या वाढविणे अशक्य

वातानुकूलित फेऱ्या वाढवण्यासाठी सामान्य लोकलच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या

प्रतिनिधी

ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका काही महिन्यांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत आली. यानंतर साधारण लोकल फेऱ्या तशाच ठेवत एसी लोकल फेऱ्यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून वाढ करण्यात आली. यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करत साधारण लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र याबाबत दुर्लक्ष करत प्रशासनाने एसी लोकल फेऱ्यांवर भर दिला. अशातच येत्या ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर नवीन वेळापत्रक लागू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या नियोजनात प्रवाशांना दिलासा मिळणार अशी अपेक्षा असतानाच सीएसएमटी-कल्याण, कसारा, खोपोली आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर नवीन फेऱ्या वाढविणे अशक्य असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडली आहे.

वातानुकूलित फेऱ्या वाढवण्यासाठी सामान्य लोकलच्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. आता ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणाऱ्या नवीन उपनगरीय वेळापत्रकातही सामान्य लोकल प्रवाशांना फारसा दिलासा नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला विचारले असता अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणे बाकी आहे. याशिवाय नवीन फेऱ्यांसाठी उपलब्ध नसलेली जागा, वेळेत उपलब्ध होऊ न शकलेल्या नवीन मार्गिका यामुळे साधारण लोकलच्या फेऱ्या एवढ्यात वाढवणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Bihar Assembly Elections 2025 : प्रशांत किशोर यांची माघार

ठाण्यात महायुतीला सुरुंग? भाजप-शिंदे सेनेचा ‘स्वबळावर’ लढण्याचा नारा, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध

मिशन ऑस्ट्रेलियासाठी तयारी सुरू! भारताचे सर्व खेळाडू पर्थ येथे दाखल; सरावानंतर रोहितची गंभीरसह दीर्घकाळ चर्चा