Kala Ghoda Arts Festival : काळा घोडा कला महोत्सवाच्या तारखा जाहीर; यंदा काय असणार खास? 
मुंबई

Kala Ghoda Arts Festival : काळा घोडा कला महोत्सवाच्या तारखा जाहीर; यंदा काय असणार खास?

मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील प्रतिष्ठित ‘काळा घोडा कला महोत्सव २०२६’ लवकरच सुरु होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या मोफत महोत्सवात कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य व वारसा उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रतिक्षीत उत्सवांपैकी एक असलेला काळा घोडा कला महोत्सव (Kala Ghoda Arts Festival-KGAF) २०२६ मध्ये पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षी हिवाळ्यात दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात भरवला जाणारा हा महोत्सव यावर्षी ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

सर्वांसाठी मोफत प्रवेश

नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला, साहित्य, संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, डिझाइन आणि लोकसंस्कृती यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. विशेष म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला असतो.

मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग - ‘काळा घोडा’

काळा घोडा कला महोत्सवाला आशियातील सर्वात मोठ्या बहुआयामी कला महोत्सवांपैकी एक मानले जाते. कलाकार, लेखक, कवी, चित्रपट दिग्दर्शक, नाट्यकलावंत, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक अशा विविध घटकांचा सहभाग या उत्सवात असतो.

कधीकाळी छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम आज मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. रस्ते, चौक, गॅलऱ्या आणि खुली मैदाने या काळात ओपन-एअर आर्ट गॅलरी आणि सादरीकरण स्थळांमध्ये रूपांतरित होतात.

ऐतिहासिक काळा घोडा परिसरात उत्सवाची रंगत

ब्रिटिश काळातील स्थापत्यकलेने नटलेला काळा घोडा परिसर संग्रहालये, कला दालनं, वसाहतीकालीन इमारती, पुस्तकांची दुकाने आणि कॅफेंमुळे आधीच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहेत. या पार्श्वभूमीवर होणारा हा कला महोत्सव परिसराला अधिकच आकर्षित बनवतो.

काळा घोडा असोसिएशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या परिसराचे जतन आणि पुनरुज्जीवन झाले असून, महोत्सवामुळे या भागाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.

२०२६ च्या महोत्सवात काय असणार खास?

दरवर्षीप्रमाणे यंदाही कला प्रदर्शनं, संगीत, नृत्य व नाट्य सादरीकरण, साहित्यिक चर्चासत्रं, चित्रपट प्रदर्शनं, स्थापत्य व इतिहासावरील विशेष टूर, बालकांसाठी खास उपक्रम, खाद्यसंस्कृतीचे दालन असे विविध उपक्रम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसह देश-विदेशातील कला-प्रेमींना एकत्र आणणारा काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्येही शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवे परिमाण देणार, यात शंका नाही.

राजकीय ताणतणावाचे घातक परिणाम

ऐतिहासिक साफसफाई मोहीम

आजचे राशिभविष्य, ३० जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हिवाळ्यात खा पौष्टिक नाचणीचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले? आवळ्यापासून घरीच बनवा नॅचरल हेअर डाय