Mumbai : मिथेनचा 'निरी'कडून अभ्यास; कांजूर डम्पिंगवरील हवेच्या गुणवत्तेवर नजर, दुर्गंधी, प्रदूषण, आगीच्या हॉटस्पॉटचा शोध घेणार संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : मिथेनचा 'निरी'कडून अभ्यास; कांजूर डम्पिंगवरील हवेच्या गुणवत्तेवर नजर, दुर्गंधी, प्रदूषण, आगीच्या हॉटस्पॉटचा शोध घेणार

कांजूर डम्पिंग ग्राऊंड दुर्गंधी प्रदूषणमुक्त व आगीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आता 'निरी' संस्थेची मदत घेणार आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : कांजूर डम्पिंग ग्राऊंड दुर्गंधी प्रदूषणमुक्त व आगीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आता 'निरी' संस्थेची मदत घेणार आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूच्या उत्सर्जनाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेण्याबरोबरच प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरातील हवेची गुणवत्ता, दुर्गंधी आणि विविध प्रदूषकांचे प्रमाण तपासण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही संस्था दोन वर्षे हा अभ्यास करणार असून त्यासाठी मनपा ३ कोटी १ लाख १६ हजार ५ रुपयांचा खर्च करणार आहे.

मुंबईत रोज सहा हजार मेट्रिक टन कचऱ्यापैकी सुमारे ९० टक्के कचऱ्यावर कांजूर येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. त्यापैकी सुमारे एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर विंड्रोज खतनिर्मिती तंत्रज्ञानाद्वारे, तर उर्वरित सुमारे ५,३०० मेट्रिक टन कचऱ्यावर बायोरिएक्टर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाते. मात्र कांजूर प्रकल्पातून मिथेन उत्सर्जन होत असल्याचा मुद्दा न्यायालयीन पातळीवरही उपस्थित झाला आहे.

त्यानंतर या उत्सर्जनाचा स्वतंत्र आणि वैज्ञानिक अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने यूसीएलएच्या अभ्यासाचा संदर्भघेत कांजूर प्रकल्पातील मिथेन उत्सर्जनाबाबत चिंता व्यक्त केली होती.

दोन भागांत अभ्यास या संपूर्ण कामासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. मिथेन उत्सर्जनाचे परिमाणीकरण, ड्रोन, उपग्रह व जमिनीवरील सेन्सर्सच्या माध्यमातून अभ्यासासाठी २ कोटी ११ लाख १६ हजार ५ रुपये खर्च अपेक्षित आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षण, जीएसआय आधारित मॅपिंग

'निरी'च्या माध्यमातून कांजूर प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून कुठे आणि किती मिथेन बाहेर पडतो, याचे मोजमाप केले जाणार आहे. त्यासाठी जमिनीवर सेन्सर्स बसविणे, ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करणे, उपग्रह छायाचित्रांचा अभ्यास करणे आणि जीआयएस आधारित मॅपिंग करण्यात येणार आहे.

मिथेनच्या हॉटस्पॉटचा शोध

मिथेनचे प्रमाण कोणत्या भागात अधिक आहे, म्हणजेच मिथेनचे हॉटस्पॉट कोणते आहेत, हे शोधले जाईल. त्याचबरोबर उष्णतेचे प्रमाण आणि संभाव्य आगीचे धोके तपासण्यासाठी थर्मल इमेजिंग व उष्णतेचा वापर केला जाणार आहे.

हॉटस्पॉट सापडल्यावर उपाययोजना

केवळ प्रदूषणाची आकडेवारी गोळा करून थांबायचे नसून, मिथेन व दुर्गंधीचे स्रोत आणि हॉटस्पॉट निश्चित करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे हा आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या व्यवस्थापनात आवश्यक बदल करण्यासाठी वैज्ञानिक आधार मिळेल.

दोन वर्षांत अंतिम अहवाल

निरीकडून ६, १२ आणि १८ महिन्यांनंतर प्रगती अहवाल, तर २४ महिन्यांनंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू

सुभाष चंद्रा यांच्यावर CBI चा गुन्हा दाखल

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी