मुंबई : कांजूर मार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे परिसरातील राहिवाशांना होणाऱ्या त्रासावरून उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनासह सरकारला चांगलेच फटकारले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने या परिसरातील दूषित वातावरण, दुर्गंधीचे निराकरण करण्यासाठी समिती नेमण्यात आली असली तरी दुर्गंधी मात्र जैसे थे आहे. पालिका प्रशासन काय करते आहे. असा संतप्त सवाल उपस्थित करताना लखनऊ येथील कचराभूमीचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.
कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दयानंद स्टॅलियन यांच्या वनशक्ती संस्थेने ॲड. झमान अली यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. तर विक्रोळी कन्नमवार नगर येथील रहिवाशांनी ॲड. अभिजित राणे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे.