मुंबई

कर्नाक उड्डाणपूल लवकरच खुला होणार; मुख्य बांधकाम पूर्ण, चार दिवसांत काम पूर्ण होणार

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम १० जून रोजी पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम १० जून रोजी पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकामी सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी कर्नाक पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंते यावेळी उपस्थित होते.

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे.

१२५ वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्यी रेल्वेन प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्य रेल्वे‍ प्राधिकरणाने मंजूर केलेल्याा आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण, मनपाच्या ह‌द्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.

१९ ऑक्टोबर २०२४ रोजी ५५० मेट्रिक टन वजनाची पहिली तुळई स्थापित करण्या‌त आली त्यावेळी उर्वरित सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करणे आव्हानात्मक होते. मात्र, पूल विभागाच्या अभियंत्यांनी अनेक आव्हानांवर मात केली.

कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे

  • शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा

  • पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित, वाढीव सुविधा उपलब्ध होणार

  • पी. डि'मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

  • पी. डि'मेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, काळबादेवी वाहतूक सुविधा

  • मोहम्मद अली मार्ग, सरदार पटेल मार्ग परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार

कसा आहे पुल

पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर’

रेल्वे हद्दीतील लांबी ७० मीटर

पालिका ह‌द्दीतील लांबी २३० मीटर

प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब

२६.५० मीटर रूंद, १०.८ मीटर उंचीच्या् दोन तुळया

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात