मुंबई

एमसीए क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक स्पोर्टिंगने विजेतेपद

वृत्तसंस्था

एमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक स्पोर्टिंगने विजेतेपद पटकाविले. मरिन ड्राइव्ह येथील मुंबई पोलीस जिमखाना मैदानात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी पारसी जिमखाना संघावर आठ विकेट्स राखून मात केली.

मॅनग्रोल स्पोर्ट्स क्‍लब आयोजित तसेच पल्स स्पोर्ट्स इव्हेंट्स इंटरटेन्मेंट यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कर्नाटक एसएने प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यांच्या गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी मारा करताना पारसी जिमखाना संघाला २५.३ षट्कांत १०१ धावांत गुंडाळले. कर्नाटक एसएच्या फलंदाजांनी विजयासाठीचे १०२ धावांचे आव्हान १९.५ षट्कांत दोन विकेटच्या माध्यमाने साध्य केले.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार