मुंबई

Mumbai-Nashik Highway Accident :भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; मोटार उलटून अक्षरशः चुराडा, चालक फरार

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना परवा रात्री उघडकीस आली. मृतांमध्ये हैसियत अली, आसादुल्हाहा आणि अफजल (उत्तर प्रदेश येथील रहिवासी) यांचा समावेश आहे.

Swapnil S

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना परवा रात्री उघडकीस आली. मृतांमध्ये हैसियत अली, आसादुल्हाहा आणि अफजल (उत्तर प्रदेश येथील रहिवासी) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिककडे जाणारी मोटार ऑरेंज गृहासमोर आली असता हा अपघात झाला. चालकाने निष्काळजी व बेफिकीर पद्धतीने वाहन चालवल्यामुळे उतारावरील वळणावर नियंत्रण सुटून मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकावर जोरात आदळली. या धडकेनंतर मोटार उलटून अक्षरशः चुराडा झाला.

अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव