मुंबई

गणेशोत्सवात मराठी कार्यक्रमांची रेलचेल ठेवा; गणेशोत्सव समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून यंदाच्या गणेशोत्सवात मराठी कार्यक्रमांची रेलचेल ठेवा, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी गणेशोत्सव मंडळाना केले आहे.

Swapnil S

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून यंदाच्या गणेशोत्सवात मराठी कार्यक्रमांची रेलचेल ठेवा, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी गणेशोत्सव मंडळाना केले आहे.

मराठी भाषा गौरव दिन आज देश-परदेशात साजरा केला जात आहे. मात्र, जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांपैकी पहिल्या १५ मध्ये असलेल्या मराठीची जेवढी भरभराट व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मंडळांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी मंडळाच्यावतीने वर्षभर जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यात मराठी कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात यावे. विशेष म्हणजे आगामी भाद्रपदमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात १०० टक्के मराठी भाषेचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे आवाहन ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले.

मराठी सण धुमधडाक्यात साजरे करा!

मंडपात मराठी सुगम संगीत, भावगीत तसेच मराठी लोककला, नाटके आयोजित करणे आवश्यक आहे. समितीने सांस्कृतिक मंत्र्यांना १० दिवसांपैकी तीन दिवस मराठी नाटके, पोवाडे असे सांस्कृतिक कार्यक्रम सरकारच्यावतीने मोफत देण्याची विनंती केली आहे. आपले सण, उत्सव धूमधडाक्यात साजरे करा, असे आवाहन दहिबावकर यांनी केले.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती