मुंबई

मुंबई : KEM रुग्णालयात धक्कादायक घटना; महिला कर्मचाऱ्याच्या भावाने डॉक्टरवर केला जीवघेणा हल्ला, आरोपी पसार

मुंबईतील परळ येथील KEM रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या भावाने रुग्णालयातीलच डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैद्यकीय संस्थांतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईतील परळ येथील KEM रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या भावाने रुग्णालयातीलच डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैद्यकीय संस्थांतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही घटना रुग्णालयाच्या आवारातच घडली असून हल्ल्यात संबंधित डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार वैयक्तिक वादातून घडल्याचे उघड झाले आहे.

बहिणीसोबतच्या संबंधातून नाराजी

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा KEM रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. आपल्या बहिणीचे डॉक्टरसोबत असलेले संबंध पाहून तो नाराज होता. रागाच्या भरात त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने डॉक्टरवर चाकूने हल्ला केला आणि तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी तपास मोहीम सुरू केली आहे.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, मुंबईतील डॉक्टरांनी सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली