मुंबई

खारकोपर-उरण ४० लोकल फेऱ्या आजपासून

खारकोपर ते उरण मार्गासाठी १४३३ कोटी रुपये खर्च आला. या रेल्वेमुळे विद्यार्थी, व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Swapnil S

मुंबई : खारकोपर-उरण दरम्यान ४० लोकल फेऱ्या आजपासून चालवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद‌्घाटन शुक्रवारी झाले. सध्या नेरुळ-बेलापूर ते खारकोपर दरम्यान रोज ४० सेवा चालवल्या जातात. (येता-जाता २०-२० फेऱ्या) आता ही सेवा उरणपर्यंत नेली जाणार आहे. शेमतीखार, न्हावा शेवा, द्रोणागिरी आदी स्टेशन या मार्गावर असतील. हा नवीन मार्ग १४.६० किमीचा आहे. बेलापूर-उरण मार्गासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च आला. त्यातील ३३ टक्के वाटा रेल्वे तर ६७ टक्के वाटा सिडकोने उचलला आहे. तर खारकोपर ते उरण मार्गासाठी १४३३ कोटी रुपये खर्च आला. या रेल्वेमुळे विद्यार्थी, व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

US Flight Chaos : अमेरिकेची विमानसेवा ठप्प; लाखो प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?

Jalgaon Earthquake : जळगावमध्ये भूकंपाचा धक्का! रावेर, भुसावळसह अनेक तालुके हादरले; हतनूर धरण परिसरातही हादरा

सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले; तोळ्यामागे २५०० रुपयांची घट

Thane : छटपूजेसाठी शहरात भव्य कृत्रिम तलावाची निर्मिती; गर्दी नियंत्रणासाठी यंदा प्रथमच टोकन व्यवस्था

ब्लू फ्लॅग मानांकनासाठी सिंधुदुर्गचे किनारे प्रतीक्षेत; भोगवेचा २०१९ पासूनचा प्रवास रखडला; रत्नागिरी-रायगडची आंतरराष्ट्रीय मानांकनात भरारी