मुंबई

आजारी महिलेकडून मुलाची हत्या; वांद्रे येथील घटनेत आईला अटक

वांद्रे येथे एका महिलेने स्वतच्या १० वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

मुंबई : वांद्रे येथे एका महिलेने स्वतच्या १० वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अभिलाषा रवींद्र औटे या ३६ वर्षांच्या आरोपी महिलेस हत्येचा गुन्हा दाखल होताख खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

अभिलाषा हिला स्क्रिझोफेनिया हा आजार असून या आजारातून ती अनेकदा आक्रमक होत असल्याने तिने तिच्या मुलाची हत्या केल्याचे सांगितले जाते. रवींद्र दिगंबरराव औटे हे गृह विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांची पत्नी अभिलाषा आणि दहा वर्षांचा मुलगा सर्वेश यांच्यासोबत वांद्रे येथील वाय कॉलनीतील मजल्यावरील रुम क्रमांक ८० मध्ये राहत होते. पत्नी अभिलाषा ही आजारी असून तिला स्क्रिझोफेनिया आजार आहे. या आजारामुळे ती अनेकदा आक्रमक होते. गुरुवारी सायंकाळी ती मुलासोबत घरी होती. रात्री दरवाजा बंद करून तिने सर्वेशची वायरने गळा आवळून हत्या केली.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण