मुंबई

Maharashtra MLC Election : भाजपचा मविआला दणका; कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील (Maharashtra MLC Election) निवडणुकीचा आज निकाल लागणार असून पहिला निकाल हा भाजपच्या (BJP) बाजूने लागला

प्रतिनिधी

आज राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या (Maharashtra MLC Election) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिला निकाल लागला असून यामध्ये भाजपचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी महाविकास आघाडीच्या (MahaVikasAaghadi) बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रेंना २०,७४८ मते पडली. तर, मविआचे उमेदवार शेकापचे नेते बाळाराम पाटील यांना ९,७६८ मते पडली. तब्बल १० हजारांहून अधिक मताधिक्याने त्यांचा पराभव झाला.

विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "हा विजय फक्त माझ्या एकटीच नाही, तर हा माझ्या मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा विजय आहे. मागील ६ वर्षांमध्ये मी जी काही कामे केली, त्याची ही पोचपावती आहे. आम्हाला तब्बल ३३ शिक्षक संघटनांचा पाठिंबा होता. तसेच, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आज सार्थकी लागला." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, शेकापचे बाळाराम पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी आपला पराभव मान्य केला आहे. त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असूनही पराभवाचा सामना करावा लागला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत