Mumbai : कुर्ल्यातील ४७७ झाडांवर कुऱ्हाड; १,६८२ झाडे पुनर्रोपित करणार  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : कुर्ल्यातील ४७७ झाडांवर कुऱ्हाड; १,६८२ झाडे पुनर्रोपित करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपडीधारकाचे कुर्ला परिसरातील मदर डेअरीच्या जागेवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पात तब्बल ४७७ झाडांचा बळी जाणार आहे. दरम्यान १,६८२ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असल्याचा दावा मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

Swapnil S

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपडीधारकाचे कुर्ला परिसरातील मदर डेअरीच्या जागेवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पात तब्बल ४७७ झाडांचा बळी जाणार आहे. दरम्यान १,६८२ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असल्याचा दावा मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

धारावीचा कायापालट होत असून धारावीतील पात्र रहिवाशांचा धारावीतच पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर अपात्र रहिवाशांचा कुर्ला, मुलुंड इत्यादी ठिकाणी पुनर्विकास करण्यात येणार आहे. कुर्ला एल विभागातील कुर्ला-३ गावठाण, भूखंड क्रमांक २ (भाग) येथील विकासकामाशी संबंधित आहे. या प्रस्तावासाठी विकासकाने अर्ज केला आहे. प्रस्तावित विकासकामामुळे बाधित होणाऱ्या झाडांची पाहणी करून त्यापैकी झाडे काढणे अथवा पुनर्रोपित करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

हरकती, सूचना नोंदवण्याचे आवाहन

कुर्ला पूर्व येथे मदर डेअरीची जागा संबंधित विकासकाने धारावीतील अपात्र रहिवाशांचा पुनर्विकास करण्यासाठी घेतली आहे. या जागेवरील ४७७ झाडे तोडण्यात येणार असून, १,६८२ झाडे पुनर्स्थापित करण्यासाठी प्रस्तावित असल्याचे नमूद आहे. याबाबत बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांत लेखी स्वरुपात या प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवा, असे आवाहन केले आहे. हरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातील कार्यालयात सुनावणी होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण २४ तास फोडण्याचीही मुभा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट पवित्रा

आधार प्रमाणीकरण सक्तीचे; मालमत्ता खरेदी-विक्रीबाबत अधिसूचना जारी, आजपासून अंमलबजावणी

टाटा ट्रस्टमधील वाद शिगेला; वेणू श्रीनिवासन यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, प्रशासकीय कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी

Mumbai : झोपड्यांवर कारवाई तर होणारच; महापालिका भूमिकेवर ठाम

Mumbai : विमान उड्डाण सुरक्षेला मोठा धोका; हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांचा दावा, नव्या डिस्प्ले सिस्टीममुळे अधिकाऱ्यांना त्रास