छायाचित्र सौजन्य : एक्स @chauthakhamba
मुंबई

लैला खान हत्याकांड: अभिनेत्रीच्या सावत्र पित्याला फाशीची शिक्षा; इगतपुरीच्या फार्महाऊसवर केली होती कुटुंबातील ५ जणांची हत्या

बॉलिवूड अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्या प्रकरणात आज (२४ मे) सत्र न्यायालयाने लैला खानच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा सुनावली.

Swapnil S

बॉलिवूड अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्या प्रकरणात आज (२४ मे) सत्र न्यायालयाने लैला खानच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा सुनावली. काश्मीरचा रहिवासी आणि लैला खानची आई सेलिनाचा तिसरा पती, परवेझ टाक याला ८ जुलै २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. २०११ मध्ये उघडकीस आलेल्या या हत्याकांडाने बॉलिवूड जगतासह सर्वत्र खळबळ उडाली होती.

या हत्याकांडाच्या चौदा वर्षांनंतर न्यायालयाने अलीकडेच परवेझला ३० वर्षीय लैला, तिची मोठी बहीण आझमीना (३२), जुळी भावंडं झारा आणि इम्रान (२५), चुलत बहीण रेश्मा आणि ५१ वर्षीय सेलिना यांच्या हत्येबद्दल दोषी ठरवले होते. हे कुटुंब फेब्रुवारी २०११ मध्ये मुंबईतून बेपत्ता झाले होते. त्यानंतर सेलिनाच्या पहिल्या पतीने ओशिवरा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात कुटुंबाचे अखेरचे लोकेशन त्यांच्या इगतपुरी फार्म हाऊसवर असल्याचे स्पष्ट झाले होते.

सुरुवातीपासूनच परवेझवर संशयाची सुई होती. कारण कुटुंबाला त्याच्यासोबतच शेवटचे पाहिले गेले होते आणि तो काश्मीरमधील त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. लैला तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांसह फेब्रुवारी २०११ मध्ये बेपत्ता झाली होती. त्यांना शेवटचे नाशिकजवळील इगतपुरी येथे परवेझ टाकसोबत पाहिले होते. काही दिवसांनी इगतपुरीतील फार्म हाऊसला आग लावण्यात आली होती. त्यामुळे लैलाचे वडील आणि सेलिनाचा पहिला पती नादिर पटेल यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी परवेझ आणि लैलाचे दुसरे सावत्र वडील आसिफ शेख यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी आसिफला ताब्यात घेतले पण नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. तर, परवेझवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारण लैलाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन इगतपुरी होते आणि परवेझ देखील शेवटचा तेथेच कुटुंबासोबत दिसला होता. इगतपुरीतील फार्म हाऊसमध्ये परवेझ आणि सेलिना यांच्यात संपत्तीवरुन वाद झाल्यानंतर टाकने सेलिनाची हत्या केली, असा आरोप आहे. त्यानंतर परवेझने आपल्या सोबत आलेल्या अज्ञात व्यक्तींच्या मदतीने कुटुंबातील इतर सदस्यांनाही संपवले आणि फार्महाऊसजवळील खड्ड्यात मृतदेहांची विल्हेवाट लावून घराला आग लावली.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत