माजी उपमुख्यमंत्र्यांची पत्नी असल्याचा बनाव; पेन्शन लाटणाऱ्या आरोपी महिलेचा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर 
मुंबई

माजी उपमुख्यमंत्र्यांची पत्नी असल्याचा बनाव; पेन्शन लाटणाऱ्या आरोपी महिलेचा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांची विधवा पत्नी असल्याचा बनाव करुन पेन्शन लाटली, असा आरोप असलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांनी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेखा पाठक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. डॉ. लेखा पाठक यांनी आदिक यांची विधवा म्हणून पेन्शन मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचाही आरोप आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांची विधवा पत्नी असल्याचा बनाव करुन पेन्शन लाटली, असा आरोप असलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांनी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेखा पाठक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. डॉ. लेखा पाठक यांनी आदिक यांची विधवा म्हणून पेन्शन मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचाही आरोप आहे.

पोलिसांकडून अटक होण्याच्या शक्यतेने डॉ. लेखा पाठक यांनी ५ मे रोजी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा अर्ज मंजूर करताना न्यायालयाने मरीन ड्राइव्ह पोलिसांना डॉ. पाठक यांना अटक न करण्याचे निर्देश दिले.

पृथ्वीराज यांच्या तक्रारीनंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे खटला सुरू झाला. डॉ. पाठक यांनी बनावट कागदपत्रे सादर केली. ऑगस्ट २००७ मध्ये आदिक यांच्या निधनानंतर डॉ. पाठक यांनी विधवा म्हणून पेन्शन मिळवली. डॉ. पाठक आदिक यांचा विवाह झाला नव्हता, असा दावा पृथ्वीराज यांनी केला. आदिक व त्यांची पहिली पत्नी शोभा यांनी घटस्फोटाच्या करारावर स्वाक्षरी केली होती, असा दावा करण्यात आला.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

साताऱ्यात ३३ वर्षांनंतर साहित्यिकांचा भव्य मेळा; ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

चांदी जैसा रंग, सोने जैसा भाव...; मूल्य, परताव्याबाबत २०२५ मध्ये चांदीच ठरली सरस

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी