मुंबई

एलआयसीची नवीन पेन्शन योजना लॉन्च

मुंबईतील ट्रायडंट येथील कार्यक्रमात निवृत्त चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.

वृत्तसंस्था

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीने एलआयसी न्यू पेन्शन प्लस (प्लॅन ८६७) योजना लाॅन्च केली आहे. ही योजना ५ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. ही एक नॉन-पार्टिसिपेंट, युनिट लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना आहे. जी सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन बचतीद्वारे कॉर्पस तयार करण्यात मदत करते. जी मुदत संपल्यावर नियमित उत्पन्नात रूपांतरित केली जाऊ शकते.

ही योजना विमा सप्ताह महोत्सवात मुंबईतील ट्रायडंट येथील कार्यक्रमात निवृत्त चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली. यावेळी जी.एन. बाजपाई, निवृत्त चेअरमन, एलआयसी आणि सेबी तसेच टी.एस. विजयन, निवृत्त चेअरमन, एलआयसी आणि इर्डा उपस्थित होते.

एलआयसीने सांगितले की, तुम्ही ही पेन्शन योजना सिंगल प्रीमियम किंवा रेग्युलर प्रीमियम पेमेंट फ्रिक्वेन्सीसह देखील खरेदी करू शकता. ग्राहकाला पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये ग्राहकांसाठी प्रीमियमच्या रकमेची मर्यादा वेगळी असू शकते.

नियमित प्रीमियम भरणाऱ्यांना ५ टक्के ते १५.५ टक्क्यांपर्यंत हमखास लाभ देणार आहे. ही योजना तरुणांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य आहे. पॉलिसीमधील एनएव्हीची गणना दररोज केली जाईल आणि प्रत्येक फंड प्रकारासाठी इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स, प्रत्येक फंड प्रकाराच्या फंड मॅनेजमेंट चार्टवर आधारित असणार आहे, असे एलआयसीने निवेदनात म्हटले आहे.

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

अर्बन कंपनी, बोट ब्रँडच्या मूळ कंपनीला IPO लाँच करण्यासाठी सेबीची परवानगी; १३ कंपन्या एकत्रितपणे १५,००० कोटी उभारणार

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी