संग्रहित छायाचित्र 
मुंबई

सुरत ते बँकॉक विमानात मद्यविक्री जोरात

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या गुजरातमधील सुरत ते बँकॉक (थायलंडची राजधानी) या चार तासांच्या पहिल्याच उड्डाणाचे उद्घाटन नुकतेच झाले. या पहिल्या प्रवासाच्या उड्डाणावेळी विमानात मद्यविक्रीला चांगलीच गती मिळाली.

Swapnil S

मुंबई : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या गुजरातमधील सुरत ते बँकॉक (थायलंडची राजधानी) या चार तासांच्या पहिल्याच उड्डाणाचे उद्घाटन नुकतेच झाले. या पहिल्या प्रवासाच्या उड्डाणावेळी विमानात मद्यविक्रीला चांगलीच गती मिळाली. काही प्रवाशांनी तर सांगितले की, विमानातील मद्याचा स्टॉकच संपला. विशेष म्हणजे गुजरातमध्ये मद्यपानावर बंदी असूनसुद्धा विमानात झालेल्या या जोरदार मद्याविक्रीने संगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

शुक्रवारी बोईंग ७३७-८ या विमानाने सुरत विमानतळावरून थायलंडला जाण्यासाठी उड्डाण केले. यावेळी विमानामध्ये प्रवासी आणि सहा विमान कर्मचारी मिळून एकूण १७५ जण होते. बोईंग ७३७-८ विमानाची प्रवासी क्षमता १७६ आहे.

रविवारी बजेट एअरलाईनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरत ते बँकॉक या फ्लाइटमध्ये मद्यविक्री चांगली झाली. मात्र काही सोशल मीडियावर मद्याचा स्टॉक संपल्याचा दावा केला आहे, त्यात काही तथ्य नाही. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर दावा केला होता की एअर इंडियाच्या विमानातील मद्य संपले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात मद्याचा आणि खाद्यपदार्थांचा पुरेसा स्टॉक होता.टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसने यावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सामान्यत: एका प्रवाशाला प्रवासादरम्यान १०० मिलीपेक्षा जास्त मद्य दिले जात नाही. विमानात पाच प्रकारची मद्ये उपलब्ध असतात.

५० मिली शिवास रिगल ६०० रुपये, ५० मिली रेड लेबल, बकार्डी व्हाइट रम आणि बीफीटर जिन प्रत्येकी ४०० रुपयांना, तसेच ३३० मिली बीरा लेगर ४०० रुपयांना उपलब्ध आहे.

प्रवासी त्यांना जेवण हवे असल्यास प्रवास सुरू होण्यापूर्वीही जेवण बुक करू शकतात किंवा फ्लाइटमध्ये खरेदी करू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन