मुंबई

मुंबईचे पोलीस आयुक्तपदासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनमध्ये लॉबिंग सुरू

मुंबईचे पोलीस आयुक्तपद हे देशात महत्त्वाचे मानले जाते. हे पद मिळवण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते

प्रतिनिधी

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर बसण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. रजनीश सेठ, सदानंद दाते, विवेक फळसणकर आदींची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.

मुंबईचे पोलीस आयुक्तपद हे देशात महत्त्वाचे मानले जाते. हे पद मिळवण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. यासाठी विविध मार्गाने पोलीस अधिकारी प्रयत्न करत असतात. स्वत: संजय पांडे हे मुदतवाढीसाठी इच्छुक नाहीत; पण त्यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला.

राज्य सरकारने पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडे यांना मुदतवाढ देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकार त्याला मान्यता देईल असे समजते. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सोयीचा आयुक्त असावा, असे राज्य सरकारला वाटते.

केंद्र व राज्य संघर्षात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी निवड झाल्यानंतर पांडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे; पण पांडे यांची ‘सार्वजनिक कल्याण’च्या भूमिकेबाबत महाविकास आघाडी सरकार नाराज असल्याचे समजते.

माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची कामगिरी चांगली नसल्याने राज्य सरकारने त्यांची उचलबांगडी केली होती. त्यांच्या जागी संजय पांडे यांना आणण्यात आले. पांडे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या केंद्र व राज्य सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पांडे हे भाजपनेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, नवनीत राणा, मोहित कंबोज, मनसेचा लाऊडस्पीकर आदी महत्त्वाचे विषय हाताळत आहेत. राष्ट्रवादी कँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर टीका होऊ लागली. त्यामुळे महाविकास आघाडीत संजय पांडेची लोकप्रियता कमी झाली. तसेच पांडे यांनी सिटिझन फोरम, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, संडे स्ट्रीट आदी उपक्रम सुरू केल्याने मुंबई पोलिसांवर ताण पडू लागला. या समाज कल्याण योजनांमुळे महाविकास आघाडीत नाराजी आहे, असे एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.सध्या पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचे नाव मुंबई पोलीस पदासाठी आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत डॉ. भूषण कुमार उपाध्याय, विवेक फळसणकर, संदीप बिष्णोई आदींची नावे ज्येष्ठतेनुसार चर्चेत आहेत. तसेच जयजीत सिंह, अमिताभ गुप्ता, सदानंद दाते, प्रभात कुमार यांच्या नावांचीही चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे मराठी व्यक्तीला या पदावर नेमण्यास जास्त इच्छुक आहेत. तर काँग्रेसला या पदावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नेमायचा आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला