मुंबई

आज व उद्या रात्री उशिरापर्यंत लोकल; मध्य रेल्वेचा गणेशभक्तांना दिलासा

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यान मुख्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या लोकल चालविणार आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यान मुख्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या लोकल चालविणार आहे. यामुळे अनंत चतुर्थीनिमित्त गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १६, १७, १८ सप्टेंबरच्या रात्री लोकल चालविण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परत गणपती विसर्जनाच्या दिवशी १७/१८ (मंगळ/बुध रात्री) चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.

डाऊन मेन लाइनवर १६, १७/१८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ३.१० वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री २.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पहाटे ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल. अप मेन लाइनवर १६ आणि १७/१८ सप्टेंबर रोजी कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ कल्याण येथून रात्री १२:०५ वाजता सुटेल आणि मध्यरात्री १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ठाणे येथून रात्री १ वाजता सुटेल आणि रात्री २ वाजता मुंबई येथे पोहोचेल.

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी