प्रतिनिधिक फोटो
मुंबई

मढ-अंधेरी प्रवास अवघ्या २० मिनिटांवर! मढ जेट्टी-वर्सोवा खाडीवरील पुलासाठी निविदा, अंतर १८.६ किमीवरून ५ किमीवर

आता वर्सोवा खाडीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामामुळे अंतर १८.६ किमीवरुन ५ किमीपर्यंत कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळ अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

Swapnil S

मुंबई - मालाड (पश्चिम) च्या मढ बेटावरील रहिवाशांना अंधेरी येथे जाण्याकरिता अंदाजे १८.६ किमीचे अंतर पार करावे लागते. त्यासाठी दीड तासाचा कालावधी लागत होता. आता वर्सोवा खाडीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामामुळे अंतर १८.६ किमीवरुन ५ किमीपर्यंत कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळ अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

याामुळे इंधन व वेळेची बचत तसेच पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत होईल, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मालाड (पश्चिम) येथील मढ बेट येथील रहिवाशांना अंधेरी येथे जाण्याकरिता अंदाजे १८.६ किमीचे अंतर पार करावे लागते. त्यामुळे मढ जेट्टी-वर्सोवा खाडीवरील पुलाच्य़ा बांधकामाची मागणी रहिवाशी, लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात होती. आता हे बांधकाम केले जाणार असल्याने अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पाची निविदा संकल्पना व बांधणी दस्तऐवज या तत्त्वावर मागवलेली होती. ज्यामध्ये प्रकल्पाचे मुख्य अभियांत्रिकी काम स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत, कामाचा खर्च, उन्नत मार्ग, केबल स्टे पूल, सीसीटीव्ही, दिवाबत्ती, नियंत्रण कक्ष व इतर यंत्रणा, पर्यावरण व्यवस्थापन अंमलबजावणी, प्रचालणे व देखभाल खर्च, कामगार उपकर, विमा संरक्षण, सविस्तर अभियांत्रिकी खर्च आणि इतर कामाकरिताचा २ हजार ३८ कोटी रूपये इतका खर्च अंदाजित केला होता. त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. सदर निविदेच्या अनुषंगाने मे. एपको-आरबीएल (जेव्ही) यांनी सर्वात कमी किंमतीची अर्थात २ हजार २९ कोटी रूपयांची बोली लावली. सदर बोली ही महानगरपालिकेच्या अंदाजपत्राच्या पेक्षा (०. ४४) टक्क्यांनी कमी आहे. प्रत्यक्ष कामाचा बांधकाम कालावधी हा ३६ महिने आहे. कंत्राटदारास थेट देय असलेली रक्कम २ हजार २९ कोटी इतकी आहे.

सदर प्रकल्पाची एकूण प्रकल्प रक्कम ३ हजार ९९० कोटी इतकी असून ज्यामध्ये प्रकल्पाच्या अनुषंगाने १८ टक्के वस्तू व सेवा कर, आकस्मित खर्च, तात्पुरती रक्कम, सानुग्रह अनुदान, कंत्राटावरील दरवृद्धी, कास्टिंग यार्ड व इतर सुविधा करीता लागणारे भाडे, आर्थिक तरतूदी, पाणी आकार, मलनिःसारण आकार, पर्यवेक्षण आकार, सल्लागार शुल्क तसेच विविध प्राधिकरण यांना द्याव्या लागणा-या शुल्काचा समावेश आहे. या प्रकल्पाचा खर्च वाढलेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान या पुलामुळे मढ बेटावरून अंधेरी येथे प्रवास करताना इंधनात बरीच बचत होणार आहे. शिवाय वेळही वाचणार आहे.

इंधन आणि वेळेत होणार बचत

वर्सोवा खाडीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामामुळे मढ ते अंधेरी हे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे इंधन व वेळेची बचत तसेच पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत होईल, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

CJP Protest Delhi : कोंडी फुटली, चर्चा सुरू

CJP Protest Delhi : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ!

संघर्षग्रस्त इराण नेमका कसा आहे?

आजचे राशिभविष्य, २३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पाऊस अन् गरमागरम चहा; अवघ्या १५ मिनिटांत बनवा 'हे' कुरकुरीत स्नॅक्स