राहुल नार्वेकर (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

....तर दिवसभरासाठी सभागृह तहकूब करणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा इशारा

विधानसभा नियम २९३ अन्वये बुधवारी विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रस्तवावरील चर्चेच्या वेळी सभागृहात मंत्री आणि गॅलरीत अधिकारी उपस्थित नसल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चांगलेच संतप्त झाले.

Swapnil S

मुंबई : विधानसभा नियम २९३ अन्वये बुधवारी विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रस्तवावरील चर्चेच्या वेळी सभागृहात मंत्री आणि गॅलरीत अधिकारी उपस्थित नसल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पुढील अर्धा तासात मुख्य सचिवांना अधिकारी गॅलरीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. याशिवाय यापुढे संबंधित मंत्री आणि अधिकारी उपस्थित नसतील तर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विधानसभेत बुधवारी विरोधी पक्षाच्या वतीने २९३ च्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सभागृहात मंत्री आणि अदृश्य मानल्या जाणाऱ्या गॅलरीत अधिकारी उपस्थित नसल्याकडे तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावेळी मंत्री आणि अधिकारी चर्चा ऐकण्यासाठी उपस्थित नसणे हा या सभागृहाचा अवमान आहे. यासंदर्भात अध्यक्षांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची मंत्र्यांना सुद्धा कदर नाही. सभागृहात मंत्री आणि गॅलरीत अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर अधिवेशन रस्त्यावर घ्या, असे वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.

यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी अधिकाऱ्यांना गॅलरीत उपस्थित राहण्याबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावरून निर्देश दिले जातील, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

संसदीय कामकाज मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश

तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाले तेव्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी झाल्याप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात घडलेला प्रकार हा सभागृहाचा अवमान करणारा आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. आता तर मंत्री सोडा अधिकारी सुद्धा गॅलरीत बसत नाहीत, असे ताशेरे ओढत नार्वेकर यांनी संसदीय कामकाज मंत्री आणि मुख्य सचिवांना सभागृहात हजर राहण्याचे निर्देश दिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...