एकनाथ शिंदे संग्रहित छायाचित्र
मुंबई

बंद सम्राटाने राज्याला १० वर्ष मागे ठेवले; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

बंद सम्राट आजही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू, रिफायनरी बंद करू, धारावी पुनर्विकास बंद करू, अशी भाषा करत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली.

Swapnil S

मुंबई : दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या विकास कामात सहभागी झालो. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत महाराष्ट्राला १० लाख कोटी रुपये दिले. त्यामुळे मविआच्या नेत्यांच्या पोटात दुखतंय. २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाले आणि बंद सम्राटाने राज्याला १० वर्षें मागे टाकले. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला पण यांनी स्थगिती देण्याचे काम केले आणि महाराष्ट्र १० वर्षें मागे टाकला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंसह मविआचा खरपूस समाचार घेतला.

मोदीजींच्या १० वर्षांच्या  काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला तब्बल १० लाख कोटी दिले. दुप्पट नाही पाच पट निधी केंद्र सरकारने दिला त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतय. बंद सम्राट आजही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू, रिफायनरी बंद करू, धारावी पुनर्विकास बंद करू, अशी भाषा करत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली. आता या बंद स्रमाटांना कायमचे घरात बंद करण्याचा निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केलाय, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  

शिवतीर्थावरुन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने वाटायचे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर विचारांचे सोने वाटायला आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस दसऱ्याचा आहे आणि २३ तारखेला दिवाळी साजरी करायची आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Heavy Rain : ठाणे, रायगडसाठी 'रेड अलर्ट'

तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३३ जणांचा मृत्यू; ५० जखमी

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत