पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी 
मुंबई

पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी

गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती भांडी, कपडे, पशुधन यांच्या नुकसानीपोटी तसेच दुकानदार, टपरीधारक यांनाही मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ जुलै रोजीच्या बैठकीत पालघर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदत घोषित केली. त्यानुसार पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी १० हजार तसेच घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीपोटी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या अथवा कच्च्या घरासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी