मुंबई

महायुतीचा अजब फॉर्म्युला! तिकीट आठवलेंच्या RPI चे; लढणार भाजपच्या चिन्हावर

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने कलिना मतदारसंघासाठी अजब फॉर्म्युला आणला आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने कलिना मतदारसंघासाठी अजब फॉर्म्युला आणला आहे. कलिना विधानसभा मतदार संघात उमेदवाराला तिकीट रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षांकडून देण्यात आले असले तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी, महामंडळ आदींची मागणी केली होती. भाजपने कलिना विधानसभा मतदार संघ आणि धारावी मतदार संघ अशा दोन जागा देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांना दिले होते. मात्र, कलिना विधानसभा मतदार संघ वगळता अन्य कुठलीही जागा दिली नाही. त्यातही कलिना विधानसभा मतदार संघात रिपाईकडून उमेदवारी आणि भाजपचे चिन्ह अशी उमेदवारी अमरजीत सिंह यांना देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी अमरजीत सिंह यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत

आता रेल्वे डब्यांमध्ये कॅमेरे बसवणार

उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित; राष्ट्रपतींनी पाच सदस्यांना केले नियुक्त