मुंबई

लेखक-दिग्दर्शकाची फसवणूक; फायनान्सरला अटक

प्रतिनिधी

मालाड परिसरात राहणाऱ्या लेखक-दिग्दर्शकाची फसवणूक करून पळून गेलेल्या अमीत ओमप्रकाश सिंह ऊर्फ अजय सिंह या तोतया फायनान्सरला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. अमीतने चित्रपट निर्मितीच्या नावाने तक्रारदारासह इतर काही लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याच्या चौकशीत इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. यातील तक्रारदार लेखक-दिग्दर्शक असून, ते मालाड परिसरात राहतात.

तीन वर्षांपूर्वी ओळख झालेल्या अमीतने त्यांना तो चित्रपट फायानान्सर, लाईन निर्माता आणि कला दिग्दर्शक असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी एका चित्रपट निर्मितीची ऑफर देताना त्यांना हवी ती मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याला त्यांचा एक मित्र खेमराजची एक कथा सांगितली होती. चित्रपटासाठी फायानान्ससह इतर कामासाठी त्याने त्यांच्याकडून सुमारे दोन लाख साठ हजार रुपये घेतले होते. अशा प्रकारे अमीत सिंहने त्यांचा त्यांच्या मित्राच्या कथेवर चित्रपट तयार करण्याचा बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन या पैशांचा परस्पर अपहार करून फसवणूक केली होती. गुन्हा दाखल होताच अमीत सिंह हा पळून गेला होता. अखेर त्याला तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली.

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज