मुंबई

बेस्टच्या कंत्राटी कामगार संपात मंगल प्रभात लोढांची मध्यस्थी ; म्हणाले, "कर्मचाऱ्यांच्या मागण्या बरोबर पण..."

पगारवाढ आणि पुरेशा सोयी-सुविधा मिळत नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्माचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

नवशक्ती Web Desk

बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा आंदोलन अद्याप सुरुच असल्याने मुंबतील नोकरदार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पगारवाढ आणि पुरेशा सोयी-सुविधा मिळत नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्माचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांना अडणींचा सामना करावा लागतोय. कर्मचारी कामावर परत येत नसल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. यानंतर हा वाद आणखीच विकोपाला गेला.

या वादावर तोडगा काढण्यासाठी आता मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. लोढा यांनी बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पण याचं वेळी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर परत येण्याची विनंती देकील त्यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा आणि सोयी-सुविधांचा प्रश्न येत्या २४ ते ४८ तासांत सुटेल, असी ग्वाही देखील लोढा यांनी दिली. तसंच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार जाणार नसल्याचंही ते म्हणाले.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन