मुंबई

वाढत्या बेरोजगारी व महागाईविरोधात मुंबईत राजभवनावर मोर्चा

प्रतिनिधी

मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ आणि वाढत्या बेरोजगारी व महागाईविरोधात मुंबई काँग्रेसतर्फे शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल अपमानजनक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान केलेला आहे. आम्ही त्यांना या अपमानजनक वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागायला सांगितले होती. पण त्यांनी ती मागितलेली नाही. म्हणून मुंबई काँग्रेसतर्फे शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोणत्याही प्रकारचे निवेदन देणार नाही आहोत. कारण आम्ही राज्यपाल म्हणून त्यांना महत्व देत नाही. ते आजपर्यंत राज्यपाल असल्यासारखे वागलेले नाहीत. आम्ही फक्त त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढून त्यांचा निषेध करणार आहोत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे कार्यध्यक्ष चरणसिंग सप्रा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे आणि युवा नेते सुरजसिंग ठाकूर उपस्थित होते.

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

मेमध्येही उष्णतेच्या लाटांचा तडाखा; सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढीचा हवामान खात्याचा इशारा