मुंबई

उद्यापासून बीएमसीच्या कार्यालय, रुग्णालयांत मास्कसक्ती; आयुक्तांचे निर्देश

कोरोनासंदर्भातील वाढते रुग्ण पाहता मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय दिला, मुंबईच्या आयुक्तांनी दिले महत्त्वाचे आदेश

प्रतिनिधी

देशभरासह राज्यातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. अशामध्ये आता प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून मुंबई महानगर पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई आयुक्त महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीनंतर त्यांनी बीएमसीच्या कार्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये मास्कसक्तीचे आदेश दिले आहेत.

आज बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल यांनी एक बैठक बोलावली होती. यामध्ये बीएमसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, बीएमसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पालिकेतील रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

पूल बंद; हाल सुरू! एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम अखेर सुरू; दादर, परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी, गैरसोयीने परिसरातील रहिवासी संतप्त